Posts

Showing posts from October, 2011

21 Durvaankurs for Shree Gajanan Maharaj ( Shegaon)

Image
शेगाव ग्रामी वसले गजानन स्मरणे तयांचा हरतील विघ्न म्हणुनी स्मार अंतरी सद्गुरूला  नमस्कार माझा श्री गजाननाला येवूनी तेथे अकस्मात मूर्ती करी भाविकांच्या मनाचीच पूर्ती उच्चिष्ट पात्राप्रती सेवियेला नमस्कार माझा श्री गजाननाला उन्हा तहानेची नसे त्यास खंत दावियेले सत्य असेची संत पाहुनी त्या चकित बंकटलाल झाला नमस्कार माझा श्री गजाननाला घेवूनी गेल्या आपुल्या गृहासी मनोभावे तो करी पूजनासी कृपा प्रसादे बहु लाभ झाला नमस्कार माझा श्री गजाननाला मरणोन्मुखी तो असे जानराव तयांच्या मुळे लाभला त्यास जीव पदतीर्थ घेता पुनर्जन्म झाला नमस्कार माझा श्री गजाननाला  पहा शुश्कवापी भरली जलाने चिलीम पेटविली तये अग्निविणे चिंचविणे नाशिले करी अमृताला नमस्कार माझा श्री गजाननाला ब्रह्मगिरीला असे गर्व मोठा करी तो प्रचारा अर्थ लावूनी खोटा क्षणार्धात त्याचा परिहार केला नमस्कार माझा श्री गजाननाला ...