21 Durvaankurs for Shree Gajanan Maharaj ( Shegaon)
शेगाव ग्रामी वसले गजानन
स्मरणे तयांचा हरतील विघ्न
म्हणुनी स्मार अंतरी सद्गुरूला
नमस्कार माझा श्री गजाननाला
येवूनी तेथे अकस्मात मूर्ती
करी भाविकांच्या मनाचीच पूर्ती
उच्चिष्ट पात्राप्रती सेवियेला
नमस्कार माझा श्री गजाननाला
उन्हा तहानेची नसे त्यास खंत
दावियेले सत्य असेची संत
पाहुनी त्या चकित बंकटलाल झाला
नमस्कार माझा श्री गजाननाला
घेवूनी गेल्या आपुल्या गृहासी
मनोभावे तो करी पूजनासी
कृपा प्रसादे बहु लाभ झाला
नमस्कार माझा श्री गजाननाला
मरणोन्मुखी तो असे जानराव
तयांच्या मुळे लाभला त्यास जीव
पदतीर्थ घेता पुनर्जन्म झाला
नमस्कार माझा श्री गजाननाला
पहा शुश्कवापी भरली जलाने
चिलीम पेटविली तये अग्निविणे
चिंचविणे नाशिले करी अमृताला
नमस्कार माझा श्री गजाननाला
ब्रह्मगिरीला असे गर्व मोठा
करी तो प्रचारा अर्थ लावूनी खोटा
क्षणार्धात त्याचा परिहार केला
नमस्कार माझा श्री गजाननाला
बागेतली जाती खाण्यास कणसं
धुरामुळे करिती मक्षिका त्यास दंश
योगबळे काढिले कंटाकाला
नमस्कार माझा श्री गजाननाला
भक्ताप्रती प्रीत असे अपार
धावुनी जाती त्या देती धीर
पुंडलिकाचा ज्वर तो निमाला
नमस्कार माझा श्री गजाननाला
बुडताच नौका नर्मेदेच्या जलांत
धावा करिती तुमचाची भक्त
स्त्री वेश घेवूनी तिने धीर दिला
नमस्कार माझा श्री गजाननाला
संसार त्यागीयेला बायजाने
गजानन सन्निध वाही जिणे
सदा स्मरे ती गुरूच्या पदाला
नमस्कार माझा श्री गजाननाला
पितांबरा करी भारी उदकांत तुंबा
पाणी नसे भरविण्या नाल्यास तुंबा
गुरुकृपेने तो तुंबा बुडाला
नमस्कार माझा श्री गजाननाला
हरितपर्ण फुटले शुष्क आम्रवृक्षा
पितांबराची घेत गुरु परीक्षा
गुरु कृपा लाभली पितांबराला
नमस्कार माझा श्री गजाननाला
चिलीम पाजावी म्हणून श्रीसी
इच्छा मनी जाहली भिक्षुकासी
हेतू तयाचा अंतरी जाणियेला
नमस्कार माझा श्री गजाननाला
बाळकृष्णा घरी त्या बाळापुरासी
समर्थ रूपे दिले दर्शनासी
सज्जनगडाहूनी धावुनी आला
नमस्कार माझा श्री गजाननाला
नैवेद्य पक्वान्न बहु आणीयेले
कांदा भाकारीसी तुम्ही प्रिय केले
कंवरासी पाहुनी आनंद झाला
नमस्कार माझा श्री गजाननाला
गाडी तुम्ही थांबविली दयाळा
गार्डा प्रति दावियेली ओ लीला
शरणांगती घेवूनी तोही आला
नमस्कार माझा श्री गजाननाला
जाती धर्म तुम्ही नाही पाळीयेला
फकिरा सवे हो तुम्ही जेवियेला
दावूनी ऐसे जना बोध केला
नमस्कार माझा श्री गजाननाला
अग्रवाल्यास सांगे म्हणे राममूर्ती
अकोल्यास स्थापुनी करी दिव्यकीर्ती
सांगता क्षणी तो पहा मानिला
नमस्कार माझा श्री गजाननाला
करंजपूरीचा असे विप्र एक
उदरी तयांच्या असे हो की दुःख
दुःखातुनी तो पहा मुक्त झाला
नमस्कार माझा श्री गजाननाला
दुर्वांकुरा वाहुनी एकवीस
नमस्कार रुपी श्रे गजाननास
साख्यादास वाही श्री गुरूच्या पदाला
नमस्कार माझा श्री गजाननाला
Created by Satchitananda Sree Gajanan Mauli Charitable Foundation (Mumbai), a Trust Registered in Mumbai with Office of the Charity Commisioner
Thanks
ReplyDeleteJai gajanan
DeleteGan gan ganat bote
Jay gajanan mauli
ReplyDeleteShri Gajanan, Jay Gajanan!
ReplyDeleteThanks
Gana gana ganate bothe
ReplyDeleteGana gana ganat bothe
ReplyDeleteJay Gajanan!!🙏🏻🙏🏻🙏🏻
ReplyDeleteगण गण गणांत बोते
ReplyDeleteJay Gajanan Maharaj 27th jan,2020
ReplyDeleteGanesh afzulpurkar jai gajanan27jan 2020
ReplyDeleteTr, 🙏🌸,🙏🙏🙏🙏🙏🌺🌹🥀🚩
ReplyDeleteJai Gajanan
ReplyDeleteJay Gajanan maharaj🙏
ReplyDeleteJai gajanan maharaj koti koyi nsmaskar💐💐👌👌🎂🎂👍👍.
ReplyDeleteJai jai gajanan gan gan ganat bote 4thfeb 2020 4.45 pm💐💐🎂🎂👌👌👍💐
ReplyDeleteआभार
ReplyDeleteJai gajanan Shree gajanan...GANA GANA GANAT BOTE....!
ReplyDeleteGan gan ganat bote
ReplyDeleteJay Gajanan!!
ReplyDeleteGan Gan Ganat gote...Jay Shree Gajanan💐🙏
ReplyDeleteJai Gajanan 🙏
ReplyDelete🙏🌹जय गजानन माऊली🌹🙏
ReplyDeleteJai Gajanan
ReplyDeleteJay gajanan mauli shegav
ReplyDeleteजय गजानन माऊली शेगांव
ReplyDelete।।अनंत कोटी ब्रम्हांड नायक महाराजाधिराज योगिराज परब्रम्ह सचितानंद भक्त प्रतिपालक शेगांवनिवासी समर्थ सदगूरु श्री संत गजानन महाराज की जय।।
ReplyDelete।।अनंत कोटी ब्रम्हांड नायक महाराजाधिराज योगिराज परब्रम्ह सचितानंद भक्त प्रतिपालक शेगांवनिवासी समर्थ सदगूरु श्री संत गजानन महाराज की जय।।
ReplyDelete🙏🙏🙏🙏🙏 जय गजानन